Sunday, 3 July 2016

मृगजळ

मृगजळ

जायचंय दूर
हे कटू सत्य माहिती आहे
तरी माझं वेडं मन
तुझ्यात इतकं गुंतत आहे.....

तू आहेस आणि नाहीस
द्वंद्व खूप सारं आहे
लांब जावं तूझ्यापासुन
तर सावलीतही तुझी चाहुल आहे....

माहीत नाही रे तुझं मन मला
सारा खेळ माझा मीच मांडला आहे
पण जाणीव होत राहते परिस्थितीची
तू म्हणजे फक्त एक मृगजळ आहे..